PM Vidyalaxmi Yojana : विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे,कारण आता PM Vidyalaxmi Yojana ही नवीन योजना केंद्र सरकार खास विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे.या योजने मार्फत विद्यार्थ्यांना 10,00,000 रु. पर्यंतचे कर्ज (Loan) देण्यात येत आहे. सदर योजने बाबतची सविस्तर माहिती पात्रता,अर्ज पद्धत,मिळणारा लाभ,शेवटची मुदत ही सर्व माहिती खाली देण्यात आली आहे.देण्यात आलेली सविस्तर माहिती वाचून मगच अर्ज करा आणि या संधीचा लाभ घ्या.
PM Vidyalaxmi Yojana
2024-25 या वर्षाचा अर्थसंकल्प जुलै महिन्यामध्ये सादर करण्यात आला त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या वेळी या योजनेची घोषणा केली.या योजने मार्फत 22 लाख दरवर्षी या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.सदर योजनेला मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे.या योजनेसाठी 2024-25 ते 2030-31 अशा सात वर्षीय कालावधीत 3,600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
सदर योजने मार्फत विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे.या कालावधी मध्ये सुमारे 7 लाख नवीन विद्यार्थ्यांना या व्याज सवलतीचा लाभ मिळणार आहे.सदर योजना पंतप्रधान विद्यालक्ष्मी पोर्टल मार्फत प्रशासित केली जाणार आहे.
PM Vidyalaxmi Yojana-योजनेची वैशिष्टे
- या योजने मार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल.
- विद्यार्थ्यांना कोणतीही वस्तू गहाण न ठेवता हे कर्ज मिळेल.
- 2024 ते 2031 या कालावधी मध्ये तब्बल 7 लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवा यासाठी 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- या योजने मार्फत विद्यार्थ्यांना 10 लाख रु. पर्यंतचे कर्ज मिळेल.
PM Vidyalaxmi Yojana-पात्रता
कोण असेल या योजनेसाठी पात्र?
- NIRF सर्वोत्तम गुणवत्तेच्या उच्च शिक्षण संस्थे मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
- विद्यार्थी ज्या संस्थेमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत ती संस्था NIRF रॅंकिंग मध्ये All इंडिया 101 किंवा राज्यातील HEIs रॅंकिंग 200 च्या आत मध्ये असावी.असे विद्यार्थी पात्र असतील.
PM Vidyalaxmi Yojana Apply-अर्ज प्रक्रिया
- सर्व प्रथम आपणास पीएम विद्या लक्ष्मी पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
- नंतर आपणास कॉमन education लोन application फॉर्म (CELAF) भरायचा आहे.
- फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार पात्रता आणि इतर शैक्षणिक अर्जासाठी अर्ज करू शकता.
PM Vidyalaxmi Yojana-कशा प्रकारे मिळेल लाभ?
- या योजनेचे लोन पोर्टल झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थी अर्ज करणार आहेत त्यावेळेस अर्ज प्रक्रिया सुलभ केली जाईल व पोर्टल सर्व बँकाना उपलब्ध होईल.
- विद्यार्थ्यांना ई-व्हाउचर व सेंट्रल बँक डिजिटल करंसी वॉलेट मार्फत व्याज अनुदान उपलब्ध होईल.
- 27.5 लाखापर्यंत च्या कर्जासाठी 75% अनुदान क्रेडिट गॅरंटी देण्यात येईल. यामुळे बँकाना कर्ज देण्यास प्रोत्साहन मिळेल.
इतर अपडेट्स | इथे क्लिक करा |
सविस्तर माहिती | इथे क्लिक करा |
हे पण वाचा : MUCBF Recruitment 2024 : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरती!इथे करा अर्ज