Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 : मित्रांनो भारतीय वायू सेनेमध्ये तुमच्यासाठी 2025 या वर्षा मध्ये नवीन नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे. ही भरती अग्निवीरवायु या पदासाठी होत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 04 वर्षे देशाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. फक्त अविवाहित पुरुष आणि महिला या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 07 जानेवारी 2025 पासुन खुली असेल. ऑनलाईन परीक्षा ही 22 मार्च 2025 रोजी होईल.
निवड झालेल्या उमेदवारांचा सैनिकी अनुभव पाहता 04 वर्षानंतर अग्निवीरवायुंना नियमित पदासाठी अर्ज करण्याची संधी देण्यात येईल. ही निवड भारतीय वायुसेनेच्या गरजांवर अवलंबून असेल. या भरतीसाठी निवड ही शारीरिक व मानसिक क्षमता, वैद्यकीय तपासणी या द्वारे करण्यात येईल. पुढे आपणास या भरतीसाठी लागणारी पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण या बद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.Indian Air Force Agniveervayu Bharti 2025
भारतीय वायूसेना अग्निवीरवायु भरती 2025
घटक | विवरण |
भरती विभाग | भारतीय वायूसेना (IAF) |
भरतीचे नाव | भारतीय वायूसेना अग्निवीरवायु भरती 2025 (01/2026) |
एकूण जागा | तूर्तास जाहीर नाहीत |
पदनाम | अग्निवीरवायु इनटेक 01/2026 |
अर्जाची शेवटची तारीख | 27 जानेवारी 2025 |
अर्ज फी | रु.550/- (GST सहित) ऑनलाईन पेमेंट |
वेतन | रु.30,000/- महिना (प्रथम वर्ष) +भत्ते/04 वर्षानंतर सेवा निधी पॅकेज सुमारे रु.10.04 लाख |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा (टप्पा I) शारीरिक चाचणी व अनुकूलता चाचणी (टप्पा II) वैद्यकीय तपासणी (टप्पा III) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 शैक्षणिक पात्रता
विज्ञान शाखा 10+2 (इंटरमिजिएट) किंवा समकक्ष परीक्षा गणित/भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसाह 50% गुणांसाहित उत्तीर्ण. किंवा 03 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/संगणक विज्ञान इ.) 50% गुणांसाहित. इतर शाखा 10+2 किंवा कोणत्याही शाखेत किमान 50% गुणांसहित उत्तीर्ण.
Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 वयाची अट
जन्मतारीख ही 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 दरम्यान असावी. 21 वर्षे भरतीच्या तारखेनुसार
भारतीय वायूसेना अग्निवीरवायु भरती 2025 शारीरिक पात्रता
उंची/छाती | पुरुष | महिला |
उंची | 152.5 से.मी | 152 से.मी |
छाती | 77 से.मी/किमान 05 से.मी फुगवून | – |
भारतीय वायूसेना अग्निवीरवायु भरती 2025 पगार आणि फायदे
- प्रथम वर्ष : रु.30,000/- महिना
- वाढीव पगार : दरवर्षी रु.3,000/-वाढ
- दुसऱ्या वर्षी : रु.33,000/-
- तिसऱ्या वर्षी : रु.36,500/-
- चौथ्या वर्षी : रु.40,000/-
- सेवा निधी पॅकेज : 04 वर्षानंतर रु.10.04 लाख वैद्यकीय सुविधा/सीएसडी फायदे आणि इतर भत्ते.
Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख | 07 जानेवारी 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 27 जानेवारी 2025 |
ऑनलाईन परीक्षा सुरू दिनांक | 22 मार्च 2025 |
महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात | PDF डाउनलोड करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (07 जानेवारी पासून सुरू) | इथे अर्ज भरा |
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- 10th/12th गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- डोमसाईल प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो (तारीख व नावसाहित)
- उमेदवाराची सही आणि अंगठ्याचा ठसा
- जातीचा दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी Email ID व मोबाईल क्रमांक तयार ठेवा.
- अर्ज हे अधिकृत पोर्टल वरूनच करायचे आहेत. अर्ज करण्यास सुरुवात ही 07 जानेवारी 2025 पासून होईल.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती अचूक भरा. चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.
- अधिक माहितीसाठी पीडीएफ पाहावी.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.