Majhi Ladki Bahin Yojana
मित्रांनो या वर्षी अधिवेशनामध्ये सर्वात मोठी आणि महत्वाची योजना कोणती असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने मध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.त्या संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे.या मध्ये अटी तसेच कागदपत्रांमध्ये सुद्धा मोठा बदल करण्यात आला आहे.कारण विरोधी पक्ष नेते आणि महिला यांच्या मागणीनंतर या योजने मध्ये बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता या योजनेमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत.या योजनेची मुदत देखील वाढवण्यात आली असून कागदपत्रांमध्ये सुद्धा बदल केला गेला आहे.आपण जर बाहेर किंवा घरामधून अर्ज अर्ज करत असाल तर या नवीन नियमांबद्दल सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर सुरू करण्यात आली आहे.या योजनेची तारीख 01 जुलै 2024 पासून 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती.या योजनेवर विरोधकांकडून टीका केल्या गेल्या कारण या मधील काही जाचक अटी आणि कागदपत्रांची पूर्तता असेल किंवा अर्ज करण्याची मुदत असेल या सगळ्या गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात महिला सेतू केंद्रावर गर्दी करत होत्या.त्यामुळे या योजनेबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी केली गेली होती आणि त्यामुळेच या योजनेमध्ये विविध बदल केले गेले आहेत त्याची माहिती पुढे पाहूया.
या योजनेच्या अगोदरच्या अटी
- अर्ज करणाऱ्या महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असाव्यात.
- अर्ज करण्याऱ्या महिलेचे वय 21 ते 60 वर्षे असावे.
- विधवा,निराधार,विवाहित महिलांना प्राधान्य.
- 2.50 लाखा पेक्षा कमी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असावे.
- अर्ज करण्याऱ्या महिलेचे बँक खाते असावे.
- अर्ज करणाऱ्या महिलेच्या नावे चारचाकी वाहन नसावे.(कुटुंबात कोणाच्याही नावे नसावी)
- शेतजमीन ही 5 एकर पेक्षा कमी हवी.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपडेट
डोमसाईल सर्टिफिकेट :
- सुरवातीस या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवासी प्रमाणपत्र हवे असल्याचे नुमद केले होते.म्हणजेच डोमसाईल सर्टिफिकेट जे अनिवार्य करण्यात आले होते परंतु काही महिलांकडे हे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्याऐवजी महिलेकडे 15 वर्षी पूर्वीचे रेशनकार्ड,मतदान कार्ड,शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला या पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
वयाची अट :
- शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी महिलांची वयाची अट 21 ते 60 वर्षे होती आता त्यामध्ये बदल करण्यात आले असून वयाची अट ही 21 ते 65 वर्षा पर्यंत करण्यात आली आहे.आता यामुळे या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात अनेक महिलांना घेता येणार आहे.ज्या महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला आहे आणि त्या महिलांनी महाराष्ट्रामधील पुरुषा सोबत विवाह केला असेल अशा वेळी त्यांच्या पतीचा शाळा सोडल्याचा किंवा जन्म दाखला अथवा अधिवास प्रमाणपत्र असल्यास महिलांना या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे.
पाच एकर शेतजमीनीची अट :
- या अगोदर या योजनेच्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाकडे पाच एकर शेतजमीन असल्यास या योजनेचा लाभ मिळत नव्हता या मागणीवर सुद्धा परत विचार करण्यात केला गेला आणि सरकारला आवाहन देखील केले गेले होते आणि त्यानुसार हा निर्णय देखील रद्द केला आहे.आणि आता ज्या शेतकरी कुटुंबाच्या नावावर एकत्रित 05 एकर शेतजमीन आहे अशा महिलाना देखील Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
वार्षिक उत्तपन्नाचे प्रमाणपत्र :
- या योजनेमध्ये महिलांच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न दाखला देखील अनिवार्य केला गेला होता परंतु हा दाखला काढण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याचे अनेक महिलांकडून सांगण्यात आले आणि त्यामुळेच ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा आहे परंतु महिलांकडे हा दाखला उपलब्ध नसेल अशा महिलाना त्यांच्या कुटुंबाचे पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड दाखवून Majhi Ladki Bahin Yojana या योजनेचा लाभ घेता येणार आहे.म्हणजेच आता उत्पन्नाचा दाखला देखील लागणार नाही.
अविवाहित महिलांना पण लाभ मिळणार :
- या योजनेमध्ये अगोदर फक्त विधवा,निराधार,विवाहित महिलांना प्राधान्य होते यामुळेच अविवाहित महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता.आता नवीन शासन निर्णयानुसार सदर योजनेसाठी कुटुंबातील एक अविवाहित महिलेला सुद्धा Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
अगोदर Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत देण्यात आली होती. परंतु सेतु मध्ये होणारी गर्दी पाहता नवीन शासन निर्णयानुसार सदर योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑगस्ट 2024 करण्यात आली आहे.महत्वाचे म्हणजे ज्या महिलांना अर्ज करण्यासाठी उशीर होईल त्यांना सुद्धा जुलै महिन्यापासून 1500 रुपये मिळणार आहेत.
महत्वाचे :
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana यामध्ये नवीन अपडेट करण्यात आले आहेत त्याची सविस्तर माहिती वर दिली आहे.ही माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा आणि या योजनेचा लाभ घ्या.
हे सुद्धा वाचा : Indian Navy Agniveer Bharti 2024 : भारतीय नौदलात अग्निवीर संगीतकार पदाची भरती!