GIC Bharti 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) मुंबई अंतर्गत अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.एकूण 110 रिक्त जागांसाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन स्वरुपात अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यास सुरुवात 04 डिसेंबर 2024 पासून सुरू झाले असून 19 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर देण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा
या भरती मार्फत सरकारी मालकीच्या विमा कंपनी मध्ये उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. त्यांना पण नोकरीची संधी मिळेल. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर पुढे रिक्त पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि अर्ज कसा करायचा या बद्दलची सविस्तर माहिती खाली पाहणार आहोत.
GIC Bharti 2024 पदांचा तपशील
जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक) स्केल -I पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.एकूण 110 पदांसाठी अर्ज करायचे असून पदवीधर असलेल्या उमेदवारांना नोकरीची ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आपले अर्ज लवकरात लवकर भरून या संधीचा लाभ घ्यावा.
GIC Bharti 2024 Notification
भरती विभाग | जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) |
भरतीचे नाव | GIC Bharti 2024 |
भरती कालावधी | कायमस्वरुपी नोकरी |
उपलब्ध पदे | 110 |
पदाचे नाव | (सहाय्यक व्यवस्थापक) स्केल -I |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
Educational Qualification For GIC Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. सामान्य,OBC उमेदवारांसाठी सर्व सेमिस्टर/वर्षांमध्ये किमान 60% आणि SC/ST उमेदवारांसाठी 55% गुण. [अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.]
Age Limit For GIC Bharti 2024
वयाची अट :
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे असावे.SC/ST उमेदवारांना पाच वर्षे तर ओबीसी उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षे सवलत दिली जाईल.
Application Fee For GIC Bharti 2024
अर्ज फी :
- सर्वसाधारण /OBC/EWS : ₹.1000/-
- SC/ST/ExSM/महिला : फी नाही
मिळणारा पगार : ₹.50,925 ते ₹. 96765/-
निवड प्रक्रिया :
- लेखी चाचणी
- गटचर्चा
- मुलाखत
- वैद्यकीय तपासणी
महत्वाची कागदपत्रे :
- जन्म दाखला
- आधार कार्ड/ पॅन कार्ड
- 10 वी व 12 वी मार्कशीट
- पदवी प्रमाणपत्रडिप्लोमा प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
- उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- जातीचा दाखला (असल्यास)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन भरती 2024 अर्ज पद्धती, तारखा
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2024
GIC Bharti 2024 PDF| अर्ज लिंक, अधिकृत जाहिरात
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
How To Apply For GIC Recruitment 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज नोंदणी करण्यापूर्वी उमेदवाराकडे सध्या वापरत असलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी असावा.
- अर्जा मध्ये विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरायची आहे जेणेकरून अर्ज बाद होणार नाही.
- मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे.
- आवश्यक ती अर्ज फी भरुन फॉर्म सबमिट करा आणि त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp Channel जॉईन करा.