Farmers Income – शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार सध्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी नवनवीन पावले उचलत आहे. शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढू शकते. या वेळीस सरकारने शेतीला नैसर्गिक चालना देण्याचे नियोजन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास प्रेरित करत आहे. सरकारने या दृष्टीने एक मोठी पाऊल उचलण्याची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी 15,000 ते 20,000 रूपयांचे अनुदान दिले जाऊ शकते. सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रोत्साहन म्हणून काम करेल.Farmers Income
केंद्र सरकारने नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंग या प्रकल्पास मान्यता देण्याची संकेत दिले आहेत. हा प्रकल्प 7.5 लाख हेक्टर जमिनीवर देशात राबविण्यात येणार आहे. अंदाजे 2500 कोटी रुपयांचा खर्च या मिशनसाठी येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याची शक्यता आहे.
या योजनेअंतर्गत सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम पाठवेल, ज्यामुळे भ्रष्टाचारी आणि मध्यस्थींची गरज भासणार नाही. ही रक्कम थेट हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. या योजनेअंतर्गत सुमारे 15000 गावांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय संशोधन या मंत्रानेच शेतकऱ्यांचे कल्याण शक्य आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी व त्यांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी अशा योजनांवरती सरकार नेहमीच भर देत आहे.
अशा नैसर्गिक शेतीला चालना दिल्याने शेतकरी केवळ आर्थिकच नाही तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे एक सकारात्मक पाऊल ठरू शकते. या उपक्रमामार्फत शेतकरी नैसर्गिक आकर्षित शेतीकडे होतील. कारण यामध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी केला जातो, ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होईल.
या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची जाणीव करून देणे आणि आर्थिक लाभ मिळवून देणे हा आहे.Farmers Income
हे पण वाचा : BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दलात 275 जागांची नवीन भरती सुरू; इथे करा ऑनलाईन अर्ज