Yojana Doot Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री योजना दुत कार्यक्रमासाठी योजना दुत नेमण्यास सुरूवात झाली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांची निवड केली जाईल.09 जुलै 2024 च्या शासन नियमानुसार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त लोकांना योजनांची माहिती देण्यासाठी योजना दुत नेमण्यात येणार आहेत. या भरतीची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे. या विषयी अधिक माहिती पात्रता, योजना दुत कामे तसेच एकूण जागा पूर्ण माहिती खाली दिलेली आहे.Yojana Doot Bharti 2024,Yojana Doot Maharashtra
Yojana Doot Bharti 2024 सविस्तर माहिती
एकूण जागा : 50,000
पदाचे नाव : योजना दुत
योजना दुत काय आहे पात्रता :
- उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे या गटात असावे.
- उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.
- उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असावे.
- उमेदवाराकडे स्वतःचा मोबाईल असणे गरजेचे आहे.
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उमेदवाराकडे स्वतःचे आधार कार्ड आणि आधार कार्ड जोडलेली बँक खाते असावे.
गेल इंडिया लिमिटेड मध्ये 391 जागांची भरती; या उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी! Gail Bharti 2024
योजना दुत आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पदवीधारक प्रमाणपत्र
- आदिवासी प्रमाणपत्र
- बँक डिटेल्स
- पासपोर्ट साईज फोटो
- ऑनलाईन अर्जासोबत दिलेला नमुन्यातील दिलेले हमीपत्र
मिळणारा पगार : ₹.10,000/- महिना
योजना दुतांची कामे :
- संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती योजना दुत घेतील.
- नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन सांगितलेले काम करणे बंधनकारक असेल.
- शासनाच्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन देण्याचा प्रयत्न करतील.
- दिवसभर केलेल्या कामांचा अहवाल बनवून अपलोड करतील.
- हजर न राहिल्यास तसेच नेमून दिलेले काम पूर्ण न झाल्यास पगार मिळणार नाही.
सविस्तर माहितीसाठी : येथे क्लिक करा