Favarni Pump Yojana|बॅटरी फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज झाले सुरू; मोबाईल वरून करा अर्ज…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Favarni Pump Yojana : शेतकरी मित्रांनो नमस्कार! शेती हा आपला पारंपारिक व्यवसाय आहे. आजकाल शेती करण्यासाठी बऱ्याच अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. शेतीसाठी लागणाऱ्या उपकरणांची कमतरता असल्याकारणाने शेतकरी मित्रांना बऱ्याच वेळेस नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. जर शेतकऱ्याकडे शेती करण्यासाठी चांगली उपकरणे असतील तर शेतकऱ्यांना शेतीतून चांगला फायदा मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची उपकरणे नसतात त्यांना दुसऱ्यांकडून उपकरणे भाड्याने घेऊन शेती करावी लागते. त्यामुळे शेतीत बराच खर्च होतो. शेतीतील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता राज्य शासनाने Favarni Pump Yojana राबवली आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना बॅटरी संचलित फवारणी पंप अनुदानावर देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन शेतकऱ्यांना अर्ज करावा लागेल. या योजनेची संपूर्ण माहिती पुढे आपण जाणून घेणार आहोत.

Favarni Pump Yojana बॅटरी फवारणी पंपासाठी लागणारी पात्रता

  • शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
  • शेतकऱ्यांकडे सातबारा व आठ अ चा उतारा देखील असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी जर अनुसूचित जाती आणि जमाती मधील असेल तर जातीचा दाखला देखील आवश्यक आहे.
  • अनुदान हे फक्त एकाच अवजारासाठी देय राहील. म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/अवजार.
  • जर एका अवजारासाठी अर्ज केला असेल तर, पुढील दहा वर्षे त्यासाठी तुम्ही डबल अर्ज करू शकणार नाही. इतर अवजारासाठी अर्ज करता येईल.

Favarni Pump Yojana बॅटरी फवारणी पंपासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • 7/12 उतारा
  • 8 अ चा उतारा
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला (अनुसूचित जाती जमाती साठी)
  • पूर्व संमती पत्र
  • घोषणा पत्र
  • खरेदी अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेने दिलेला तपासणी अहवाल.

Yojana Doot Bharti 2024: योजना दुत भरती 2024; बघा संपूर्ण माहिती

Favarni Pump Yojana

Favarni Pump Yojana बॅटरी फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक करणे आवश्यक आहे.
  • https://mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर शेतकरी योजना हा पर्याय निवडा.
  • तुम्ही तुमचा अर्ज मोबाईल, लॅपटॉप किंवा ग्राहक सेवा केंद्र मधून करू शकता.
  • अर्ज असा करा ही लिंक शोधून कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्याय वरती क्लिक करा.
  • समोर एक अर्ज येईल त्यामध्ये विचारायला जाणारी माहिती व्यवस्थित भरा.
  • कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या बटनावरती क्लिक करा.
  • यंत्रसामग्री अवजारे या पर्यायावर क्लिक करून एक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडा.
  • मशीनच्या प्रकारामध्ये बॅटरी संचलित फवारणी पंप हा प्रकार निवडा.
  • अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून सूचना वाचून घ्या आणि Ok बटनावर क्लिक करा.
  • योजनेच्या अटी आणि शर्ती मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स

MAHADBT वेबसाईटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा

महत्त्वाचे :

Favarni Pump Yojana साठी तुम्हाला 23.60 रू एवढे पैसे भरावे लागणार आहेत. पेमेंट करण्याचे पर्याय निवडा प्रोसेस फॉर पेमेंट या पर्यायावर क्लिक करा इथे तुम्हाला पेमेंट करण्याचे अनेक पर्याय दिसतील त्यामधील सोपा पर्याय क्यूआर कोड हा निवडा पेमेंट केल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा.

मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. आपल्या शेतकरी मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या www.mahagovbharti.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या धन्यवाद!