NIACL Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी (NIACL) मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मार्फत तब्बल 500 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 01 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे. तुम्ही जर पुढील पात्रता निकष पूर्ण करत असाल तर या भरतीसाठी अर्ज करु शकता. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.NIACL Bharti 2024
राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
NIACL Bharti 2024 थोडक्यात माहिती
भरती विभाग : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी अंतर्गत नोकरी
भरतीचे नाव : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी भरती 2024
एकूण पदे : 500 जागा
पदाचे नाव : असिस्टंट (Assistant)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी भरती 2024 पात्रता निकष
पदाचे नाव : असिस्टंट
शैक्षणिक पात्रता :
- पदवीधर
- ज्या ठिकाणासाठी अर्ज केला आहे प्रादेशिक भाषेचे ज्ञान असावे.
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी भरती 2024 वयाची अट
- अर्जदाराचे वय 01 डिसेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे
- SC/ST : 05 वर्षे सवलत
- ओबीसी : 03 वर्षे सवलत
NIACL Bharti 2024 अर्ज फी
- इतर श्रेणी : ₹.850/-
- SC/ST/PWD : ₹. 100/-
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी भरती 2024 निवड प्रक्रिया
- पूर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- प्रादेशिक भाषा परीक्षा
हे पण वाचा : CWC Recruitment 2024| केंद्रीय वखार महामंडळात बंपर भरती!जाणून घ्या माहिती; लगेच करा अर्ज
NIACL Bharti 2024 पगार, अर्ज पद्धती, तारखा
मिळणारा पगार : ₹.40,000/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
शेवटची तारीख : 01 जानेवारी 2025
भरतीसाठी लागणारी कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पोस्ट संबंधित पदवी आणि डिप्लोमा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
- ईमेल आयडी
- कायम रहिवासी प्रमाणपत्र
- स्वाक्षरी
- पत्त्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
NIACL Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात | Coming Soon |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (17 डिसेंबर 2024 पासून सुरू) | इथे क्लिक करा |
असा करा ऑनलाईन अर्ज
- वरील पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज हा अधिकृत पोर्टल द्वारेच स्वीकारण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडा.
- अर्ज दिलेल्या मुदती मध्ये करावेत त्यानंतर कोणतेही अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2025 आहे.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचा.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी मध्ये काम करण्याची इच्छा असेल, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी भरती 2024 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.