Solapur Bank Recruitment 2025 : ट्रेनी क्लर्क पदासाठी शानदार संधी! वाचा सर्व माहिती

Solapur Bank Recruitment 2025 : सोलापूर जनता सहकारी बँक, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विश्वासार्ह मल्टीस्टेट सहकारी बँक, 2025 साठी Trainee Clerk या पदावर भरती करणार आहे. पद संख्या अजून जाहीर करण्यात आलेली नाही. बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.पदवीधर उमेदवारांना नोकरीची ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता,वयाची अट,अर्ज फी,अर्ज कसा करावा आणि नोकरी ठिकाण या बद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.सोलापूर शहरात नोकरीची संधी शोधत असलेल्या तरुणांना नोकरी करण्याची उत्तम संधी आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.Solapur Bank Recruitment 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा

Solapur Bank Recruitment 2025 Notification

भरतीची सविस्तर माहिती

पदाचे नाव : Trainee Clerk
पद संख्या : अजून घोषित नाही.
नोकरीचे ठिकाण :
सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि विजयपूरा.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवीधर असणे गरजेचे.
  • संगणक ज्ञान आवश्यक (MS Word, Excel, Email, आणि टायपिंग).

वयोमर्यादा

  • ३१ डिसेंबर २०२४ रोजी अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • मागासवर्गीय उमेदवारांना वयात ५ वर्षांची सवलत.

फी आणि अर्ज प्रक्रिया

अर्ज शुल्क: ₹८८५/- (GST सहित).
फी फक्त ऑनलाइन भरता येईल.

ही भरती पाहा : UPSC NDA Bharti 2025 : राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकॅडमीसाठी सुवर्णसंधी! बघा संपूर्ण माहिती

अर्ज कसा करायचा?

  • Solapur Janata Sahakari Bank च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज सादर करा.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
  • अर्ज करताना फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
  • सदरील भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवरून भरावेत.
  • उमेदवाराकडे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी असावा.
  • अर्ज फॉर्म भरताना आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावीत.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी आणि मगच अर्ज सबमिट करावा.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात PDF पाहावी.
Solapur Bank Recruitment 2025

परीक्षेची माहिती

  • परीक्षा Computer Based Test (CBT) प्रकारची असेल.
  • प्रश्न पत्रिका MCQ Type स्वरूपात असेल.
  • परीक्षा सोलापूर शहरातील विविध केंद्रांवर घेतली जाईल.
  • हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र, वेळ, आणि तारीख दिली जाईल.

निवड प्रक्रिया आणि वेतन

  • निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, मुलाखत, शैक्षणिक पात्रता, आणि अनुभवाच्या आधारे केली जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला हंगामी कालावधीसाठी नेमले जाईल.
  • कामगिरी समाधानकारक असल्यास नियुक्ती कायम केली जाईल.
  • वेतन बँकेच्या नियमानुसार ठरवले जाईल.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: १३ डिसेंबर २०२४
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ डिसेंबर २०२४
  • परीक्षा तारीख: नंतर कळवली जाईल

Solapur Bank Recruitment 2025 महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

सोलापूर जनता सहकारी बँकेची माहिती

सोलापूर जनता सहकारी बँक ही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एक प्रतिष्ठित सहकारी बँक आहे. उत्कृष्ट बँकिंग सेवा, ग्राहकाभिमुख दृष्टिकोन, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँकेने सहकारी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सारांश :
Trainee Clerk पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी वेळ न दवडता आपला अर्ज सादर करावा. ही एक सुवर्णसंधी आहे जी तुमच्या भविष्याला आकार देऊ शकते.