RBI JE Bharti 2025 : मित्रांनो आपण जर नोकरी शोधत असाल ती पण बँकेमध्ये तर तुमच्यासाठी एक सुर्वणसंधी चालून आली आहे.कारण आता भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये 011 रिक्त पदांची भरती होत आहे त्यासाठी अधिसूचना नुकतीच जाहीर केली आहे.या भरती अंतर्गत ” ज्युनियर इंजिनिअर (Civil) व ज्युनियर इंजिनिअर (Electrical)” ही पदे भरण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 20 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
RBI JE Bharti 2025 अधिसूचना
तपशील | माहिती |
भरती विभाग | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) |
भरतीचे नाव | RBI JE Bharti 2025 |
भरती प्रकार | बँकिंग क्षेत्रात नोकरी |
एकूण पदे | 011 |
पदाचे नाव | ज्युनियर इंजिनिअर (Civil) व ज्युनियर इंजिनिअर (Electrical) |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | 20 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा/भाषा प्राविण्य चाचणी (LPT) |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
आरबीआय जेई भरती 2025 पदांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | ज्युनियर इंजिनिअर (Civil) | 07 |
02 | ज्युनियर इंजिनिअर (Electrical) | 04 |
एकूण | 011 |
RBI JE Bharti 2025 पात्रता निकष
1.ज्युनियर इंजिनिअर (Civil) : (i) किमान 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST : 55% टक्के) किंवा 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST: 45% टक्के)
2.ज्युनियर इंजिनिअर (Electrical) : (i) किमान 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST : 55% टक्के) किंवा 55% गुणांसह इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग पदवी.(SC/ST : 45% टक्के)
ही भरती बघा : भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ 30000+ जागांसाठी बंपर भरती!RRB Group D Bharti 2025
वयाची अट : 01 डिसेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षे असावे.[SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सवलत]
RBI JE Bharti 2025 अर्ज फी
- खुला/OBC/EWS : ₹.450 +18% GST
- SC/ST/PwBD/EXSM : ₹.50+18% GST
- कर्मचारी उमेदवार : अर्ज फी नाही.
RBI JE भर्ती 2025 महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्जास सुरुवात : 30/12/2024
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 20/01/2025
- अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख : 20/01/2025
- परीक्षा दिनांक : 08 फेब्रुवारी 2025
RBI JE भर्ती निवड प्रक्रिया
1. ऑनलाईन परीक्षा :
- इंग्रजी भाषा – 50 गुण
- अभियांत्रिकी विषय पेपर 1 – 100 गुण
- अभियांत्रिकी विषय पेपर 2 – 100 गुण
- सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क – 50 गुण
- एकूण गुण – 300
2. भाषा प्रवीणता चाचणी (LPT) :
- उमेदवारांनी अर्ज केलेल्या RBI झोनच्या स्थानिक भाषेत पात्र असणे आवश्यक आहे.
RBI JE भर्ती 2025 महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
RBI JE Bharti 2025 ऑनलाईन अर्ज करण्याचे टप्पे
- सर्वप्रथम www.rbi.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- आता कनिष्ठ अभियंता भरती 2025 या लिंकवर क्लिक करा.
- स्वत:ची नोंदणी करा वैध तपशीलांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- वैयक्तिक, शैक्षणिक तसेच व्यावसायिक तपशील अचूक भरा.
- तुमचा फोटो आणि सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा.
- ऑनलाईन स्वरुपात पूर्ण अर्ज फी भरा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे.
- अर्ज फॉर्म भरल्यानंतर पूर्ण तपासून मगच सबमिट करा.
- भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल RBI JE Bharti 2025 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.