Bombay High Court Cleark Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदासाठी 155 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता आणि अटी याची माहिती सविस्तर पणे खाली देण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 पर्यंत असेल. त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरून या संधीचा फायदा घ्यावा.
वाचकांसाठी सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
Bombay High Court Cleark Bharti 2025
भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय
भरतीचे नाव : मुंबई उच्च न्यायालय भरती 2025
एकूण जागा : 155
पदाचे नाव : लिपिक (क्लर्क)
नोकरी ठिकाण : मुंबई
मुंबई उच्च न्यायालय भरती 2025
पदाचे नाव आणि तपशील
- पदाचे नाव : लिपिक (क्लर्क)
Bombay High Court Cleark Bharti 2025 Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता
1.लिपिक (क्लर्क) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्स मधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मी) iii) MS-CIT प्रमाणपत्र.
वयाची अट : अर्जदाराचे वय 14 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्ष [SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सूट]
अर्जाची फी : ₹.100/-
मिळणारा पगार : ₹.29,200 ते 92,300/-
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू झालेली तारीख : 22 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 फेब्रुवारी 2025
महत्त्वाची कागदपत्रे
- Email आयडी/मोबाईल क्रमांक
- आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड
- जातीचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- सही (काळ्या पेनाने केलेली असावी)
- अनुभव प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी प्रमाणपत्र
- इतर संबंधित कागदपत्रे
Bombay High Court Cleark Bharti 2025 Use Full Links
जाहिरात PDF | डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
How To Apply For Bombay High Court Cleark Bharti 2025
- सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक वरती देण्यात आली आहे.
- वर देण्यात आलेल्या क्लिक या पर्यायावरती क्लिक करून भरतीच्या मुख्य पृष्ठावर या.
- रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून आता पुढे जा.
- आता विचारल्या प्रमाणे सर्व योग्य ती माहिती भरा. ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक टाकणे बंधनकारक आहे.
- अर्जामध्ये जर माहिती अपूर्ण असेल तर तो अर्ज बाद करण्यात येईल.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी अर्ज फी भरा.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर योग्य भरल्याची खात्री करून मगच सबमिट करा आणि भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.
महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.