Bandhkam Kamgar Scholarship : होय मित्र आणि मैत्रिणींनो आपण जर शिक्षण घेत असाल आणि नोंदणीकृत बांधकाम कामगार पुत्र असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आपणास जवळपास 10 हजार ते 60 हजार रु. पर्यंतची स्कॉलरशिप मिळवण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. लगेच संपूर्ण माहिती वाचून घ्या आणि कागदपत्रे एकत्र करा आणि आजच आपला फॉर्म भरा.
Bandhkam Kamgar Scholarship
पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना | ₹.2,500/- प्रति वर्ष |
आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना | ₹.5000/- प्रति वर्ष |
अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना | ₹.10,000/- प्रति वर्ष |
पदवीच्या शिक्षणासाठी | ₹.20,000/-प्रति वर्ष |
पदव्युत्तर शक्षणासाठी | ₹.25,000/-प्रति वर्ष |
मुलांच्या एम एस सी आय टी चा खर्च | महामंडळ देणार |
दहावी बारावी मध्ये 50 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाल्यास | ₹.10,000/- |
Bandhkam Kamgar Scholarship Apply Online
आपणास यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंकचा वापर करू शकता.https://iwbms.mahabocw.in/claim-management/claim-main-form
अर्ज सबमिट केल्यानंतर आपणास ही सर्व कागदपत्रे घेऊन आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतरच आपला अर्ज ग्राह्य धरला जाईल.
आवश्यक असणारी कागदपत्रे
- ज्यांच्या नावे बांधकाम कामगार नोंद आहे त्यांचे आधार कार्ड
- बँक पासबुक/रेशन कार्ड
- ज्यांच्या नावे स्कॉलरशिप अर्ज भरायचा आहे त्यांचे आधार कार्ड
- शाळा सोडण्याचा दाखला/दहावीचे मार्कशीट
- चालू बोनाफाईड सर्टिफिकेट
- पाठीमागच्या वर्षातील मार्कशीट
- आयडी कार्ड
वरील सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड केल्यानंतरच आपला फॉर्म जमा होईल.
Bandhkam Kamgar Scholarship Status Check
या स्कॉलरशिप चा स्टेटस चेक करण्यासाठी आपणास महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करून मग स्टेटस चेक करता येईल.