Nashik Mahakosh Bharti 2025 : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी झाले असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. नाशिक विभाग लेखा व कोषागार संचालनालय मध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत सबमिट करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक,धुळे,जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दूरच्या ठिकाणी नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. या पदाला आकर्षक वेतनश्रेणी आणि अनेक फायदे देखील दिले जातील.तुम्हाला अधिक माहिती मिळवण्यासाठी, अर्ज करण्याची लिंक आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज सबमिट करावा.
Nashik Mahakosh Bharti 2025 पदांचा तपशील
एकूण रिक्त : 059 जागा
पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल (गट-क)
शैक्षणिक पात्रता : (i) उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असवी. (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट : अर्जदाराचे वय हे 23 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे असावे.[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सूट]
अर्ज फी : खुला : रु.1000/- राखीव : रु.900/-, ExSM : फी नाही]
Nashik Mahakosh Bharti 2025 पगार,अर्ज,तारखा
मिळणारा पगार : रु.29,200/- ते 92,300/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 23 फेब्रुवारी 2025
परीक्षा : नंतर सूचित केले जाईल.
महत्वाची कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- उमेदवाराची सही
- शैक्षणिक कागदपत्रे
- ओळखीचा पुरावा
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- MS-CIT प्रमाणपत्र
Nashik Mahakosh Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स
![Nashik Mahakosh Bharti 2025: नाशिक विभाग लेखा व कोषागार संचालनालय मध्ये भरती; पदवीधरांना नोकरीची संधी..](https://mahagovbharti.com/wp-content/uploads/2024/08/gif.webp)
जाहिरात PDF – Click Here
ऑनलाईन अर्ज – Click Here
अधिकृत संकेतस्थळ – Click Here
महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.