Mahadbt Krushi Yantrikikaran : शेतकरी मित्रांनो नमस्कार, शेतकरी मित्रांसाठी एक महत्वाची योजना शासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शेती अवजारे/यंत्रे आणि याबरोबर ट्रॅक्टर, बैल चलित, मनुष्य चलित व स्वयंचलित इ. अवजारे यंत्रे असतील. यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. कोणत्या यंत्रासाठी/अवजारांसाठी किती अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करायचा. यासाठी कागदपत्रांची पूर्तता काय असेल याची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Mahadbt Krushi Yantrikikaran 2024
शेतकरी बांधवांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज भरायचा आहे. शासनामार्फत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांचा अर्ज एकाच ठिकाणी करता यावा म्हणून यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टल द्वारे शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व योजनांचे अर्ज किंवा फॉर्म भरता येतात. याच पोर्टल द्वारे आज आपण कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कोणकोणत्या बाबींसाठी अनुदान देण्यात येणार आहेत हे पाहणार आहोत.
हे पण वाचा : मागेल त्याला विहीर योजने अंतर्गत मिळणार 4 लाखांपर्यंत अनुदान; वाचा संपूर्ण माहिती..! Magel Tyala Vihir Yojana
- ट्रॅक्टर/पॉवर टिलर
- ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित व अवजारे
- बैलचलित यंत्र/अवजारे
- मनुष्य चलित यंत्र/अवजारे/प्रक्रिया संच
- फलोत्पादन यंत्र आणि अवजारे
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र आणि अवजारे
कृषी यांत्रिकीकरण योजना 2024
स्वयंचलित यंत्र आणि अवजारे या 10 बाबींसाठी जवळपास अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये वेगवेगळे यंत्र आणि अवजारे आहेत. ते आपण खाली देण्यात आलेल्या जाहिरात PDF मध्ये पाहू शकता. तसेच विविध अवजारे आणि यंत्रासाठी किती अनुदान मिळणार आहे हे पण त्यामधे देण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेवुया कोणकोणते शेतकरी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
Mahadbt Krushi Yantrikikaran
शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. संबंधित शेतकऱ्याच्या नावे 7/12 व 8 अ चा उतारा असणे आवश्यक आहे. शेतकरी अनुसूचित जाती आणि जमाती मधील असल्यास त्याचा दाखला असणे आवश्यक आहे. फक्त एकाच अवजारासाठी साठी किंवा यंत्रासाठी अनुदान देण्यात येणार आहे.ट्रॅक्टर अथवा यंत्र किंवा अवजारे यापैकी एकालाच अनुदान देण्यात येईल.
येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरा
ही माहिती आपणास आवडली असेल तर लगेच तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. अशाच नवनवीन योजनेच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www. mahagovbharti.com या साईट वर भेट द्या.