ESIC IMO Bharti 2025 : मित्रांनो भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रशासकीय अधिकाराखाली, कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) या विभागामध्ये विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) पदाच्या तब्बल 608 रिक्त जागा भरण्यासाठी ESIC IMO Bharti 2025 ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 31 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून या संधीचा फायदा घ्यावा.
जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, रिक्त पदांचा तपशील, अर्ज फी, मिळणारा पगार, अर्ज कसा करायचा तसेच नोकरीचे ठिकाण आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. तुम्हाला जर रोज नवीन नोकरीच्या अपडेट्स हव्या असतील तर व्हॉट्सॲप आयकॉन वर क्लिक करा आणि आमचा नोकरी ग्रुप जॉईन करा.
ESIC IMO Bharti 2025 Details
जाहिरात क्र.________
पदनाम आणि इतर तपशील
पद क्र. | पदनाम | पदसंख्या |
---|---|---|
01 | विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) श्रेणी -II | 608 |
एकूण | 608 |
Educational Qualification For ESIC IMO Bharti 2025
शैक्षणिक पात्रता :
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे MBBS पदवी असावी.
- रोटेटिंग इंटर्नशिप असणे अनिवार्य आहे.
- असे उमेदवार जे CMSE-2022 व CMSE-2023 च्या प्रकटीकरण यादीमध्ये आहेत असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
ESIC IMO भरती 2025 वयाची अट काय असेल
- [SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट असणार आहे.]
- CMSE-2022 : 26 एप्रिल 2024 रोजी 35 वर्षापर्यंत
- CMSE-2023 : 09 मे 2025 रोजी 35 वर्षापर्यंत
अर्ज फी : कोणतीही अर्ज फी लागू नाही.
मिळणारा पगार : ₹.56,100/- ते 1,77,500/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
(अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी)
ESIC IMO Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा
कार्यक्रम | तारखा |
---|---|
अर्ज सुरू झालेली तारीख | 16 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 जानेवारी 2025 |
परीक्षा | नंतर सूचित करण्यात येईल. |
ESIC IMO Bharti 2025 Important Links
महत्त्वाच्या लिंक्स | |
---|---|
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
UPSC Disclosure List | CMSE-2022 CMSE-2023 |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
महत्वाची कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
ESIC IMO भरती 2025 भरतीसाठी असा करा अर्ज
- अर्ज भरण्याची पद्धत ऑनलाईन आहे.31 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करावा.
- अर्ज करण्यापूर्वी पात्रता तपासा आणि मगच अर्ज करा.
- अर्जामध्ये देण्यात आलेली माहिती योग्य रित्या भरावी. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
- सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- तुमचा सध्या वापरात असलेला मोबईल क्रमांक आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- फॉर्म भरल्यानंतर रीचेक करून मगच अपलोड करा.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर टाकून आपल्याला आपले फोटो व सही अपलोड करायचे आहे.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.
टीप :
ESIC IMO भरती 2025 या भरतीची माहिती कृपया तुमच्या जवळच्या आणि गरजू मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांच्याकडे वरील पात्रता असेल.तुमच्या या माहिती मुळे त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.