Territorial Army Bharti 2023|भारतीय प्रादेशिक सेना भरती 2023|त्वरित अर्ज करा

Territorial Army Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Territorial Army Bharti 2023:नमस्कार मित्रानो जर तुम्ही भारतीय सेने मध्ये भरती होण्याचे स्वप्न बगत असाल तर तुमच्या साठी एक आनंदाची बातमी आहे.प्रादेशिक सेना (Territorial Army) आता 19 पदांवरती सरळ भरती घेत आहे.प्रादेशिक सेना भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिध्द झाली आहे.Territorial Army Bharti 2023 या भरती अंतर्गत 18 पदे पुरुष उमेदवारांसाठी आणि 1 पद महिला उमेदवारासाठी ठेवण्यात आले आहे.प्रादेशिक सेना (Territorial Army) 2023 साठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 23 ऑक्टोबर पासून ते 21 नोव्हेंबर 2023 पर्यंत ठेवण्यात आली आहे.प्रादेशिक सेना (Territorial Army) 2023 साठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि लिंक खाली दिल्या आहेत.

Territorial Army Recruitment 2023

या आर्टिकल मध्ये आपण प्रादेशिक सेना (Territorial Army) 2023 संबधी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.या मध्ये पात्रता,निवड प्रक्रिया,वयोमर्यादा,अर्ज फी आणि इतर माहिती पाहणार आहोत.प्रादेशिक सेना (Territorial Army) 2023 अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या सविस्तर माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.भरती संबधी सविस्तर माहिती जाहिरीतीत उपलब्ध आहे.

रिक्त जागा तपशील:

  • पदसंख्या :19
  • पदांचा तपशील :

प्रादेशिक सेना (Territorial Army) ने 2023 साठी 19 रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिध्द केली आहे.खाली रिक्त पदांची माहिती दिली आहे.

वर्ग रिक्त पदे
पुरुष18
महिला01
एकूण 19
प्रादेशिक सेना (Territorial Army) भरती प्रक्रिया दोन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आयोजित करत असते.ज्या मध्ये नागरिक आणि माजी सैनिकांना आमंत्रित केले जाते.या भरती साठी अर्ज 23 ऑक्टोबर पासून भरण्यास सुरु होतील. आपण या भरती संबधी माहिती पाहणार आहोत.
भरती संस्था प्रादेशिक सेना (Territorial Army)
पदाचे नाव  आर्मी ऑफिसर
एकूण पदे 19
वेतन पदानुसार
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 नोव्हेंबर 2023
ऑफिसियल वेबसाईट jointerritorialarmy.gov.in

Territorial Army Bharti 2023:प्रादेशिक सेना (Territorial Army) अंतर्गत 19 पदांवरती भरती घेण्यात येत आहे.तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे.अर्ज करण्यासाठी प्रादेशिक सेना (Territorial Army) ने 21 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे.अधिक माहिती साठी खाली दिलेले PDF पाहू शकता.

सविस्तर जाहिरात PDF पाहण्यासाठी येथे Click करा.

महत्त्वाच्या तारखा:

प्रादेशिकसेना (Territorial Army) अंतर्गत 19 पदांवरती भरती साठीची अधिसूचना जाहीर केली आहे.या भरती साठी Online अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 21 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.तसेच ऑनलाइन प्रवेश परीक्षेची दिनांक ही डिसेंबरच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात ठेवण्यात आली आहे.भरतीच्या सविस्तर माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.भरती संबधी सविस्तर माहिती जाहिरीतीत उपलब्ध आहे.

अधिसूचना जाहीर दिनांक12 ऑक्टोबर 2023
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक 23 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 नोव्हेंबर 2023
परीक्षा दिनांक 3rd /4th आठवडा डिसेंबर 2023

शैक्षणिक पात्रता:

प्रादेशिक सेना (Territorial Army) भरती साठी उमेदवार हा मान्यताप्राप्त युनिवर्सिटी(विद्यापिठातून) पदवीधर असावा. भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही बॅचलर पदवी असावी.

प्रादेशिक सेना (Territorial Army) ची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे Click करा.

अर्ज फी:

Territorial Army Bharti 2023 साठी अर्ज फी सामान्य,ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या वर्गासाठी रु.500/- आहे.अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,महिला,PWD आणि माझी सैनिक यांच्या साठी अर्ज फी रु.500/- आहे.उमेदवारांनी अर्ज फी Online भरावी.

वर्ग अर्ज फी
सामान्य,ओबीसी आणि ईडब्ल्यूएसरु. 500/-
अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,महिला,PWD,माझी सैनिकरु.500/-
परीक्षा शुल्क डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड,नेट बँकिंग या द्वारे भरावीOnline

वयोमर्यादा:

प्रादेशिक सेना (Territorial Army) भरती साठी वयोमर्यादा ही 18 ते 42 वर्षापर्यंत ठेवण्यात आली आहे.

Territorial Army Bharti 2023
  • किमान वय :18 वर्षे
  • कमाल वय :42 वर्षे
  • आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादे मध्ये सवलत दिली जाते.

आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे Click करा.

परीक्षा नमुना आणि अभ्यासक्रम:

विषय प्रश्न गुण कालावधी
Reasoning252502 तास
गणित2525
सामान्य ज्ञान2525
इंग्रजी2525
परीक्षा ही एकाच सत्रात घेतली जाईल.परीक्षेचा कालावधी हा 02 तासाचा असेल.परीक्षा ही संगणकावर घेतली जाईल.परीक्षेत एक तृतीयांश निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आले आहे.

परीक्षा केंद्र:

जयपुर,पुणे,बेंगलोर,हैदराबाद,कोलकाता,दार्जिलिंग,गुवाहाटी,दीमापुर,चंडीगढ़,जालंधर,शिमला,दिल्ली,अंबाला, हिसार,लखनऊ,प्रयागराज,आगरा,भुवनेश्वर,डेहराडून,उधमपुर,श्रीनगर आणि नगरोटा

निवड प्रक्रिया:

प्रादेशिक सेना (Territorial Army) भरती साठी निवड प्रक्रिया ही पुढीलप्रमाणे असेल.

  • लेखी परीक्षा आणि मुलाखत
  • SSB
  • वैधकीय चाचणी
  • गुणवत्ता यादी

वरील सर्वं प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे:

Territorial Army Bharti 2023 साठी उमेदवाराजवळ खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.भरतीच्या सविस्तर माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

  • 10th उत्तीर्ण मार्कशीट
  • 12th उत्तीर्ण मार्कशीट
  • पदवीधर मार्कशीट
  • उमेदवाराचे फोटो आणि सही
  • जातीचा दाखला
  • उमेदवाराचा मोबाईल नंबर आणि ई-मेलआयडी
  • आधार कार्ड
  • इतर कागदपत्रे ज्या साठी उमेदवाराला लाभ हवा आहे.

अर्ज कसा करावा:

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जा.
  • Recruitment लिंक वरती क्लिक करावे.
  • त्यानंतर Territorial Army Bharti 2023 वरती क्लिक करावे.
  • सूचना वाचून फॉर्म भरावा.
  • आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी.
  • फॉर्म भरताना माहिती बरोबर भरावी.
  • अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट करावा.
  • शेवटी अर्जाची प्रत डाऊनलोड करून स्वत: जवळ ठेवा.

अर्ज करताना घ्यावयाची काळजी:

  • Territorial Army Bharti 2023 साठी अर्ज Online पद्धतीने करावा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी नियम,अटी पात्रते विषयी पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
  • देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज भरताना चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • उमेदवार वर दिलेल्या लिंक वरती जाऊन अर्ज भरू शकतात.
  • अर्ज फी ही डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड,नेट बँकिंग या द्वारे भरावी.

मुलाखतीच्या वेळी महत्त्वाच्या सूचना:

  • मुलाखती वेळी उमेदवारांनी सर्व सूचनांचे पालन करावे.
  • मुलाखती वेळी उमेदवारांनी ओळखपत्र सोबत आणावे.
  • मुलाखतीचे ठिकाण उमेदवारांना कळविण्यात येईल.
  • अधिक माहिती साठी वरील जाहिरात PDF वाचू शकता.
  • वरील सर्व नियम व अट अटी लागू आहेत.

प्रादेशिक सेना (Territorial Army) बद्दल माहिती:

प्रादेशिक सेना (Territorial Army) ही एक अर्धवेळ स्वयंसेवकाची एक सहायक लष्करी संस्था आहे.जी भारतीय सेनेला सहाय्य सेवा प्रधान करते.प्रादेशिक सेना (Territorial Army) भूमिका नियमित सैन्याला स्थिर कर्तव्यापासून मुक्त करणे.आणि नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी आणि अत्यावश्यक सेवांच्या देखभालीमध्ये नागरी प्रशासनास मदत करणे आणि आवश्यकतेनुसार नियमित सैन्यासाठी युनिट्स प्रदान करणे आहे.भारतीय संरक्षण दल आणि भारतीय प्रादेशिक दल चे  उत्तराधिकारी म्हणून प्रादेशिक सैन्य(Territorial Army) ची स्थापना 1948 च्या प्रादेशिक आर्मी कायद्याद्वारे करण्यात आली.

प्रादेशिक सेना (Territorial Army) ने देशाच्या स्वातंत्र्या पासून 1962 चे चीन-भारत युद्ध,1971 मध्ये भारत-पाक युद्ध आणि कारगिल युद्धासह भारताच्या सर्व युद्धा मध्ये भाग घेतला आहे.

प्रादेशिक सेना (Territorial Army) काम:

प्रादेशिक सेना (Territorial Army) भूमिका नियमित सैन्याला स्थिर कर्तव्यांपासून मुक्त करणे आणि नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी आणि अत्यावश्यक सेवांच्या देखभालीसाठी नागरी प्रशासनाला मदत करणे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा नियमित सैन्यासाठी युनिट्स प्रदान करणे आहे. प्रादेशिक सेना (Territorial Army) नोकरी ही प्रत्येक तरुणाची पहिली पसंती असते.

Important Links:

Start Territorial Army Bharti 2023
23 October 2023
Last Date Online Application form21 November 2023
Official NotificationClick Here
Official Website Click Here
Apply Online Click Here
Territorial Army Bharti 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.


टीप:
उमेदवारांनी Territorial Army Bharti 2023 साठी आपले अर्ज online लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी साईटला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.