SSC Result 2025 दहावीचा निकाल या संकेतस्थळावर पाहा
SSC Result 2025 : मित्रांनो सर्वात आनंदाची बाब म्हणजे आज दहावीचा निकाल आहे. सर्वप्रथम आपणास निकालाबद्दल शुभेच्छा.. आता आपणास प्रश्न उपस्थित झाला असेल की हा निकाल कुठे आणि कसा पाहायचा? तर काळजी करू नका आम्ही आपणास याची माहिती खाली दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज 13 मे 2025 रोजी दुपारी ठीक 01 वाजता SSC बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात येईल. या वर्षी सुमारे 16 लाख मुलांनी परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता.
SSC Result 2025 निकाल पाहण्याचे अधिकृत संकेतस्थळ
- mahresult.nic.in
- mahahsscboard.in
- sscresult.mkcl.org
- sscresult.mahahsscboard.in
- results.digilocker.gov.in
SSC Result 2025 कसा पाहाल निकाल
- वर दिलेल्या पैकी कोणत्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- SSC Examination March 2025 Result किंवा तत्सम लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव (हॉल तिकीट वरती असणारे) प्रविष्ट करा.
- आता सबमिट अथवा View Result या बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढा.
मित्रांनो निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी तुमचा रोल नंबर आणि आईचे प्रथम नाव असणे आवश्यक आहे. तुमचे हॉल तिकीट जवळ ठेवा. ऑनलाईन निकाल हे तात्पुरते प्रमाणपत्र आहे.मूळ प्रत आपणास शाळेतून मिळेल.