SBI CBO Bharti 2025 : ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या आणि सरकारी नोकरी किंवा बँक भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक (SBI) ने “सर्कल बेस्ड ऑफिसर” पदासाठी भरती जाहीर केली आहे. आजपासून, म्हणजेच 9 मे पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 29 मे पर्यंत अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज करू शकतात. एकूण 2964 पदांसाठी ही भरती होणार आहे.इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी निश्चित शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी भारतीय स्टेट बँकेने जाहीर केलेली अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणती शैक्षणिक पात्रता असावी लागते आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.