RRB NTPC Bharti 2025 : मित्रांनो रेल्वे मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बाब म्हणजे भारतीय रेल्वे मध्ये 30,307 जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नामी संधी आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची विंडो 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल आणि ती 29 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहील.
सदरील भरतीसाठी करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज कसा करावा या बद्दलची संपूर्ण माहिती या लेखामध्ये देण्यात आलेली आहे.अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
RRB NTPC Bharti 2025 Notification
भरती विभाग | RRB NTPC अंतर्गत |
भरती श्रेणी | केंद्र सरकारी |
एकूण जागा | 30,307 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | 29 सप्टेंबर 2025 |
वयाची अट | 18 ते 36 [शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सूट] |
RRB NTPC Vacancy Details
पदाचे नाव | रिक्त जागा | पगार |
मुख्य व्यावसायिक व तिकीट पर्यवेक्षक | 6235 | ₹.35,400 |
स्टेशन मास्टर | 5623 | ₹.35,400 |
गुड्स ट्रेन मॅनेजर | 3562 | ₹.29,200 |
कनिष्ठ लेखा सहाय्यक व टंकलेखक | 7526 | ₹.29,200 |
वरिष्ठ लिपिक व टंकलेखक | 7367 | ₹.29,200 |
Eligibility Criteria For RRB NTPC Bharti 2025
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेली असावी. टंकलेखक पदांसाठी टायपिंग स्कील टेस्ट आवश्यक आहे.
◾वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षे
Selection Process RRB NTPC Bharti 2025
- CBT 1 (प्रथम संगणक आधारित परीक्षा)
- CBT 2 (द्वितीय संगणक आधारित परीक्षा)
- टायपिंग/अप्टिट्यूड टेस्ट (लागू असल्यास)
- कागदपत्र पडताळणी
- मेडिकल चाचणी (A2, B2, C2 प्रमाणे)
महत्वाच्या तारखा (Important Links)
- अर्ज सुरू दिनांक : 30 ऑगस्ट 2025
- अर्जाची शेवटची तारीख : 29 सप्टेंबर 2025
How To Apply For RRB NTPC Jobs
- सर्वप्रथम अधिकृत https://indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- नवीन नोंदणी करा, अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज हा अचूक आणि बरोबर भरलेला असावा.
- अर्ज दिलेल्या मुदती पर्यंत करावेत. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- आवश्यक असल्यास अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
सदर भरती सरकारी नोकरीची उत्तम संधी असून 7व्या वेतन आयोगानुसार चांगला पगार व अनेक भत्ते यामध्ये मिळतात. संगणक आधारित परीक्षा प्रणालीमुळे निवड प्रक्रिया पारदर्शक असून पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे!
अधिकृत अधिसूचना व अर्ज लिंक लवकरच उपलब्ध केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता आपली तयारी सुरू करावी.