पी एम किसान योजना|19 वा हफ्ता कधी जमा होणार? वाचा संपूर्ण माहिती इथे PM Kisan Yojana

PM Kisan Yojana – पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. पी एम किसान योजने मार्फत पात्र असणाऱ्या देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 ₹. दिले जातात. ही रक्कम 2000 हजाराचा एक हफ्ता या प्रमाणे दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर चार महिन्यांनी एक हफ्ता जमा होतो. या योजनेचे आत्ता पर्यंत एकूण 18 हफ्ते जमा करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना आता या योजनेच्या पुढील हफ्त्याची उत्सुकता लागली आहे. गेल्या महिन्यात या योजनेचा 18 वा हफ्ता जमा करण्यात आला आहे.05 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा 18 वा हफ्ता जमा करण्यात आला. राज्यातील लाखों शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेचा हफ्ता नेमका कधी जमा होणार या बद्दलची माहिती हाती आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PM Kisan Yojana पी एम किसान योजनेचा पुढील हफ्ता कधी जमा होणार?

पी एम किसान योजनेचा 18 वा हफ्ता जमा झाल्यानंतर आता 19 वा हफ्ता देखील येत्या काही महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. खरे तर पी एम किसान योजनेची रक्कम प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते. फेब्रुवारी 2025 पर्यंत सदर योजनेचा पुढील हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी 2025 पर्यंत या योजनेचा हफ्ता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 19 व्या हफ्त्याचे 2000 हजार रुपये दिले जाणार असल्याचे मीडिया द्वारे माहिती देण्यात आली आहे. परंतु या बाबतीत केंद्र सरकारच्या वतीने कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. आता यामुळे या योजनेचा पुढील हफ्ता नेमका कधी जमा होणार हे विशेष पाहण्यासारखे आहे. या योजनेचा पुढील हफ्ता मिळणार की नाही हे कसे पाहायचे याची माहिती खाली पाहणार आहोत.

PM Kisan Yojana यादीत नाव नेमके कसे पाहायचे?

https://pmkisan.gov.in/सरकारच्या या अधिकृत वेबसाईट वर जावे. त्यानंतर (beneficiary status) हा पर्याय निवडा. नंतर आधार क्रमांक किंवा बँक अकाऊंट प्रविष्ट करा व डेटा मिळवा या वरती क्लिक करा.

तुमचे सर्व तपशील स्क्रीनवर दिसतील याद्वारे आपणास योजनेचा लाभ मिळेल की नाही हे समजेल. लाभार्थी यादी तुमचे नाव असेल तर तुम्हाला या योजनेचा पुढील हफ्ता मिळणार आहे.

हे पण वाचा : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात ढगफुटी; राज्यातील या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट! चिंता वाढवणारी बातमी