मागेल त्याला विहीर योजने अंतर्गत मिळणार 4 लाखांपर्यंत अनुदान; वाचा संपूर्ण माहिती..! Magel Tyala Vihir Yojana

Magel Tyala Vihir Yojana : शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मागेल त्याला विहीर योजने अंतर्गत आता 4 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. पात्र असणाऱ्या लाभार्थींना विहिर खोदकामासाठी हे अनुदान देण्यात येणार आहे. 4 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेती मधून चांगले उत्पन्न घ्यायचे असल्यास पिकांना पाणी फार महत्वाचे असते. शेतीसाठी पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसेल तर पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांकडे विहीर नाही आहे. ही समस्या लक्षात घेता महाराष्ट्र शासन रोजगार निर्मिती अंतर्गत मागेल त्याला विहीर योजना राबवत आहे.

हे पण वाचा : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 20,000 रूपये; केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी नवी योजना! Farmers Income

आता यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज कुठे आणि कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखामध्ये खाली देण्यात आली आहे. माहिती व्यवस्थित जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Magel Tyala Vihir Yojana

मागेल त्याला विहीर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या योजनेचा अर्ज आपण मोबाईल द्वारे ही करू शकता त्याची संपूर्ण प्रक्रिया खाली देण्यात आली आहे.

  • अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांना MAHA-EGS Horticulture/Well app या ठिकाणी अर्ज करावा लागेल. हे ॲप प्ले स्टोअर वरती सुद्धा उपलब्ध आहे.
  • ॲप सुरू करून लॉगिन या पर्यायावर लाभार्थ्यांनी टच करावे.
  • अर्ज केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अर्जाची सध्याची स्थिती पाहू शकता.
  • तुमच्यासमोर आता एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये विहीर अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
  • आता लाभार्थ्यांनी या ठिकाणी स्वतःची माहिती भरायची आहे. लाभार्थ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, जिल्हा, तालुका, गाव आणि ग्रामपंचायत.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर लाभार्थ्यांनी जॉब कार्ड क्रमांक खालील चौकटी मध्ये टाकायचा आहे. जॉब कार्ड फोटो पण टाकावा
  • लाभार्थ्यांनी आपण कोणत्या प्रवर्गातील आहे ते निवडावे.
  • त्यानंतर चौकटीमध्ये विहीर भूमापन क्रमांक टाका. जो सातबारावर असतो.
  • भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री करून पुढे जा या बटणावर क्लिक करा.
  • या बटनावर क्लिक केल्यानंतर प्रपत्र अ (संमती पत्र) दिसेल.
  • आता पुढे जा या बटणावर क्लिक करा. या ठिकाणी प्रपत्र ब असेल.
  • आता अर्ज जमा करा या बटणावर क्लिक करा.
  • लाभार्थ्यांनी अर्ज करताना जो मोबाईल क्रमांक दिला आहे त्यावरती ओटीपी क्रमांक येईल तो त्या चौकटीमध्ये टाका.
  • आता आपणास धन्यवाद आपला अर्ज यशस्वीरित्या भरलेला आहे असा मेसेज दिसेल.

ही माहिती आपणास आवडली असेल तर लगेच तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. अशाच नवनवीन योजनेच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www. mahagovbharti.com या साईट वर भेट द्या.