29 सप्टेंबरला मिळणार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता!Ladki Bahin Yojana Update|बघा माहिती

Ladki Bahin Yojana Update – मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.लाडकी बहीण या योजनेच्या तिसऱ्या हपत्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे.या बाबतची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी ही घोषणा केली आहे.आता हा हप्ता कधी जमा होणार याची चर्चा जोरात चालू आहे.याच बद्दलची माहिती म्हणजे तिसऱ्या हपत्याची तारीख आणि मिळणारी रक्कम या बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.चला तर मग जाणून घेऊया या बद्दलची सविस्तर माहिती.

Ladki Bahin Yojana Update

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा व सुरवात जुलै महिन्यात करण्यात आली असून,अनेक महिलांनी आवश्यक कागदपत्रे वेळेवर न उपलब्ध झाल्यामुळे अनेक अडचणी तयार झाल्या होत्या.हे कारण लक्षात घेता अर्ज करण्याची मुदत देखील वाढवण्यात आली होती.कागदपत्रांच्या कारणामुळे महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला

मित्रांनो 29 सप्टेंबर 2024 रोजी रायगड मध्ये तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडणार आहे.या मार्फत जुलै व ऑगस्ट महिन्यातील राहिलेल्या महिलांना सुद्धा पैसे मिळणार आहेत.24 ऑगस्ट नंतर आलेले अर्ज छाननी करून झाले आहेत त्यांना देखील तिसऱ्या हफत्याचे पैसे मिळणार आहेत.

या हपत्याची रक्कम ही 29 सप्टेंबर पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.या योजनेचा लाभ राज्यातील जवळपास दोन कोटी महिलांना लाभ होणार आहे.Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update

अशी चेक करा यादी

  • सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा.
  • त्यानंतर होमपेज ओपन होईल.
  • लॉगिन या पर्यायावर क्लिक करून सर्व तपशील भरा व सबमिट करून तुमची माहिती बघा.
  • तुमच्या जिल्ह्या नुसार अधिकृत संकेतस्थळावर (महानगरपालिका/जिल्हा परिषद/नगर परिषद) तुम्हाला यादी मिळेल.
  • तुमच्या ग्रामपंचायती मध्ये देखील तुमची यादी मिळेल

अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

हे देखील वाचा : अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये करिअरची उत्तम संधी!56 रिक्त जागांची भरती सुरू|FDA Bharti 2024

अशाच नवीन योजनांच्या माहितीसाठी आमचा WhatsApp Group जॉइन करा.