JSW Udaan Scholarship 2024 – मित्रांनो इकडे लक्ष द्या तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.सर्व विद्यार्थ्यांना JSW फाउंडेशनच्या माध्यमातून स्कॉलरशिप दिली जात आहे. सदर योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. हा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. मुलगा व मुलगी दोन्ही या स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेचे मुख्य उद्देश आहे की अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे. सदर योजनेसाठी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत. सदर योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 ते 50 हजार स्कॉलरशिप दिली जाईल. या शिष्यवृत्तीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जात नाही. खालील प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाईल.
JSW Udaan Scholarship 2024
- इंजिनिअरिंग साठी 50 हजार रुपये
- पदवीधरांना 30 हजार रुपये
- पदव्युत्तर पदवीधरांसाठी 30 हजार रुपये
- मेडिकल क्षेत्रासाठी 50000 रुपये
- डिप्लोमा साठी 10 हजार रुपये
- प्रोफेशनल डिग्री कोर्स साठी 25000 रुपये
JSW Udaan Scholarship 2024 Eligibility Criteria
सदर शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता
- प्रथम वर्षामध्ये शिकणाऱ्या डिप्लोमा, डिग्री किंवा इतर कोणताही कोर्स सुरू असावा.
- या योजनेचा लाभ मुल आणि मुली दोन्ही घेऊ शकतात.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे/विद्यार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 08 लाखांपेक्षा कमी असावे.
- उमेदवारांना मागील शैक्षणिक वर्षांमध्ये किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- बँक पासबुक
- चालू वर्षाची ऍडमिशन पावती किंवा बोनाफाईड
JSW Udaan Scholarship 2024 अर्ज करण्यासाठी 👉 इथे क्लिक करा
हे पण वाचा
29 सप्टेंबरला मिळणार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता!Ladki Bahin Yojana Update|बघा माहिती
अशाच नवनवीन भरती, योजना आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.