महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात ढगफुटी; राज्यातील या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट! चिंता वाढवणारी बातमी

Havaman Andaj 2024 : शेतकरी मित्रांनो मान्सून गेल्यानंतरही पावसाचे सावट दूर काही झालेले नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार दणका दिला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील हवामान कोरडे पहावयास मिळाले आहे.

हवामान खात्या मार्फत पावसाचा अंदाज देण्यात आला होता मात्र पाऊस काही झाला नाही. काल मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. हाती आलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जिल्ह्यामधील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने अक्षरशः जिल्ह्याला झोडपून काढले आहे.जिल्ह्यामधील काही भागांमध्ये ढगफुटी पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये द्राक्ष बागायतदारांचे नुकसान झाले आहे.

हाता तोंडाशी आलेला घास आलेला घास हिरावून जाईल अशी भीती शेतकरी मित्रांमध्ये निर्माण झाली आहे.आजही महाराष्ट्रात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार आज देखील महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता देण्यात आली आहे. आय एम डी ने पुढील एक ते दोन दिवसांमध्ये पाऊस सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.

शेतकरी मित्रांनो हवामान खात्याने तसा अलर्ट दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज दिला आहे. सदरील जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई मध्ये हलक्या पावसाच्या सरींची शक्यता देण्यात आली आहे.आय एम डी ने मुंबई मध्ये अंशतः ढगाळ वातावरण असेल आणि काही भागांमध्ये हलका पाऊस पडू शकतो.

सध्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण असल्याने असल्याने अजून हवी तशी थंडी पडली नाही. राज्यामध्ये पावसाचे सत्र सुरूच आहे. मात्र लवकरच हे वातावरण कोरडे होईल, वातावरण कोरडे झाल्यानंतर पुन्हा थंडी पडण्यास सुरुवात होईल. असे सांगितले जात आहे.

हे पण वाचा : Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तट रक्षक दलात घडवा करिअर! आजच करा अर्ज