CPCB Recruitment 2025 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.जे उमेदवार नोकरी शोधत आहेत आणि सरकारी नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी एक ही एक उत्तम संधी आहे.उमेदवारांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ cpcb.nic.in वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.अर्ज दाखल करण्यासाठीच्या सर्व सूचना जाहिराती मध्ये देण्यात आलेल्या आहेत.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा.28 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.

CPCB Recruitment 2025 भरतीचा आढावा
एकूण रिक्त जागा : 69
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB)
पगार : रु.18,000/- ते 1,77,500/-
CPCB Jobs 2025 पदांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | शास्त्रज्ञ ‘ब’ | 22 |
02 | सहाय्यक कायदा अधिकारी | 01 |
03 | वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक | 02 |
04 | वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक | 04 |
05 | तांत्रिक पर्यवेक्षक | 05 |
06 | सहाय्यक | 04 |
07 | लेखा सहाय्यक | 02 |
08 | कनिष्ठ अनुवादक | 01 |
09 | वरिष्ठ ड्राफ्ट्समन | 01 |
10 | कनिष्ठ तंत्रज्ञ | 02 |
11 | वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक | 02 |
12 | उच्च विभाग लिपिक (UDC) | 08 |
13 | डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड II | 01 |
14 | स्टेनोग्राफर ग्रेड II | 03 |
15 | कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक | 02 |
16 | लोअर विभाग लिपिक (LDC) | 05 |
17 | फील्ड अटेंडंट | 01 |
18 | मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस) | 03 |
Educational Qualification For CPCB Recruitment 2025
शैक्षणिक पात्रता : पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. यासाठी 10th/12th/अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/कायदा/यांत्रिक अभियांत्रिकी/स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी/पदव्युत्तर पदवी धारक अर्ज करू शकतात.काही पदांसाठी अनुभव व टायपिंग देखील आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी PDF पहावी.
वयाची अट : अर्जदाराचे वय हे 18 ते 35 वर्षापर्यंत निश्चित करण्यात आली आहे.पदानुसार वयाची अट वेगवेगळी असल्याने खाली देण्यात आलेली जाहिरात पहावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत देण्यात येईल.
अर्ज फी : दोन तासाच्या परीक्षेसाठी 1,000 रु. तर अर्ध्या तासाच्या परीक्षेसाठी 500 रु. अर्ज फी भरावी लागेल. अनुसूचित जाती, जमाती, महिला/माजी सैनिकांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे, परंतु त्यांना दोन तासांच्या परीक्षेसाठी २५० रुपये आणि एक तासाच्या परीक्षेसाठी १५० रुपये द्यावे लागतील.
निवड प्रक्रिया : सर्व प्रथम लेखी परीक्षा त्यानंतर कौशल्य चाचणी (Skill Test) व कागदपत्रांची तपासणी होईल. त्यानंतर वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.
CPCB Recruitment 2025 IMP Dates & Links
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 28 एप्रिल 2025
- अर्ज पद्धत – ऑनलाईन
आवश्यक कागदपत्रे
- अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो (3 आठवड्यांपेक्षा जुना नसावा, jpg/jpeg स्वरूपात)
- स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत (काळ्या/निळ्या शाईने, jpg/jpeg स्वरूपात)
- उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज केले असल्यास, सर्वात अलीकडील अर्ज अंतिम म्हणून ग्राह्य धरला जाईल.
- आवश्यक कागदपत्रे नसल्यास, अर्ज अपूर्ण समजून नाकारला जाईल. सर्व माहिती नीट तपासूनच फॉर्म अंतिम सबमिट करावा, कारण नंतर कोणताही बदल शक्य नाही.
- अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट आउट घेऊन भविष्यासाठी ठेवावी.
- उमेदवाराला अर्जाची हार्ड कॉपी पोस्टाने पाठवण्याची गरज नाही.
CPCB Recruitment 2025 महत्वाच्या लिंक्स
जाहिरात [PDF] | जाहिरात पाहा |
ऑनलाईन अर्ज | इथे करा अर्ज |
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.