CIDCO Clerk Bharti 2025 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. या भरती अंतर्गत लेखा लिपिक (क्लर्क) पदाच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज 28 जानेवारी 2025 पासून सुरू झाले असून ते 07 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून या संधीचा फायदा घ्यावा.वरील पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी खाली देण्यात आलेल्या आहेत. त्या वाचून मगच अर्ज करायचा आहे.CIDCO Clerk Bharti 2025
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
गुणवत्ता यादीत येण्याकरीता उमेदवाराने ऑनलाईन लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
विहित अर्हता/अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.
एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास दि. 02.12.2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.
वर देण्यात आलेल्या क्लिक या पर्यायावरती क्लिक करून भरतीच्या मुख्य पृष्ठावर या.
रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून आता पुढे जा.
आता विचारल्या प्रमाणे सर्व योग्य ती माहिती भरा.
ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक टाकणे बंधनकारक आहे.
अर्जामध्ये जर माहिती अपूर्ण असेल तर तो अर्ज बाद करण्यात येईल.
फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी अर्ज फी भरा.
अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर योग्य भरल्याची खात्री करून मगच सबमिट करा आणि भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.
🎯महत्वाचे :
CIDCO Clerk Bharti 2025 ची ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी नोकऱ्यांबद्दल अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Mahagovbharti.com ला रोज भेट देत जा.