Maharashtra Public Service commission Recruitment 2023|महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मध्ये ६१५ जागांसाठी भरती

Maharashtra Public Service commission Recruitment 2023

Maharashtra Public Service commission Recruitment 2023 :- महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदा करीता ६१५ भरती होणार असून पोलीस उपनिरीक्षक(MPSC) या पदा साठी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार online अर्ज करू शकतात.०२ डिसेंबर २०२३ रोजी पूर्व परीक्षा महाराष्ट्रातील ७ जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.भरती विषयी अन्य माहिती खाली दिली आहे.Maharashtra Public Service commission Recruitment 2023 (MPSC) या मध्ये नोकरी करणे प्रत्येकाचे स्वप्न असते,तरुणांना ही एक चांगली संधी आहे.आपण या लेखा मध्ये या भरती बाबत असणारी पात्रता, वयोमर्यादा,पगार आणि इतर माहिती पाहणार आहोत.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
Maharashtra Public Service commission Recruitment 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Public Service commission Recruitment 2023

 तपशील  कालावधी
 अर्ज भरण्याचा कालावधी ११ सप्टेंबर ते 0३ ऑक्टोबर २०२३
 ऑनलाइन पद्धतीने परीक्षा फी भरण्याची अंतिम दिनांक ०३ऑक्टोबर २०२३
 SBI मध्ये चलनाद्वारे परीक्षा फी भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०२३
 चलनाद्वारे परीक्षा फी भरण्याची अंतिम दिनांक ०६ ऑक्टोबर २०२३ बँकेच्या वेळेत
सविस्तर जाहिरात PDFयेथे पाहा
पदांबाबत माहिती:

पद:-पोलीस उपनिरीक्षक

नोकरीचे ठिकाण:- महाराष्ट्र

एकूण पदे:-६१५

वेतनश्रेणी:-३८६०० ते १२२८०० अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे इतर भत्ते.

पात्रता:-पदवीधर आणि ०४ वर्षे नियमित सेवा,१२ वी उत्तीर्ण आणि ०५ वर्षे नियमित सेवा १० उत्तीर्ण आणि नियमित ०६ वर्षे सेवा.(महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत असलेले सहायक पोलीस उप- निरीक्षक,पोलीस नाईक व पोलीस शिपाई हे परीक्षेस पात्र असतील.

शैक्षणिक पात्रता:-उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि ४ वर्षे नियमित सेवा केलेला असावा.महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची HSC परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा:-अमागास उमेदवार-कमाल वयोमर्यादा -३५ वर्षे.मागासवर्गीय उमेदवार -कमाल वयोमर्यादा -४० वर्षे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक ०३ऑक्टोबर २०२३ पर्यंत असेल .

कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी परीक्षेच्या सलग तीन संधी मिळूनही उमेदवाराने एखद्या परीक्षेसाठी अर्ज केलेला नसेल तर संबधित उमेदवाराने सदर परीक्षेची संधी घेतली असे मानण्यात येईल.

विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.

अधिक माहिती साठी पुढील संकेतस्थळावर भेट द्या-www.mpsc.gov.in

Maharashtra Public Service commission Recruitment 2023

परीक्षचे टप्पे:- परीक्षा खालील तीन टप्प्यामध्ये घेण्यात येईल:-

१) पूर्व परीक्षा -१०० गुण

२) मुख्य परीक्षा -३०० गुण

३) शारीरिक चाचणी -१०० गुण

पूर्व परीक्षा :-प्रश्नपत्रिकेचा तपशील पुढील प्रमाणे

  विषय माध्यम प्रश्नसंख्या व गुण दर्जाकालावधी   प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
मराठी मराठी २५ शालांत एक तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी  
 इंग्रजी  इंग्रजी २५   
 सामान्य ज्ञान इंग्रजी व  मराठी ५०   
-:अभ्यासक्रम:-
 अ .क्र घटक व उपघटक   गुण
 मराठी सर्व सामान्य शब्द संग्रह,व्याकरण,म्हणी व वाक्यप्रचार तसेच अन्य प्रश्नाची उत्तरे २५
 इंगजी  General vocabulary, sentence structure, grammar २५
 सामान्य ज्ञान  एकूण
 १) आधुनिक भारताचा इतिहास ५०
 २) भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल 
 ३) भारतीय अर्थव्यवस्था -जागतिकीकरण, खाजगीकरण यांचा विशेष अभ्यास 
 ४)ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन रचना, संगठन, कार्ये 
 ५) महाराष्ट्रातील समाज सुधारक 
 ६) शेजारील देशांशी असलेले संबध 
 ७) चालू घडामोडी 
शारीरिक चाचणी:-

१) मुख्य लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र उमेदवारांना शारीरिक चाचणी द्यावी लागेल.

२) मुख्य लेखी परीक्षेच्या निकालानंतर सर्वसाधारण पणे दोन आठवड्यानंतर कधीही शारीरिक चाचणी घेतली जाईल.

३)शारीरिक चाचणीचे दिनांक बदलून मागता येणार नाही किंवा त्रकार करता येणार नाही.

४) आयोगाने निश्चित केलेल्या तारखेस व ठिकाणी उमेदवाराने शारीरिक चाचणीसाठी हजर राहणे आवश्यक आहे.

५) आयोगाकडून शारीरिक चाचणीचा कार्यक्रम निश्चित होताच तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

६) शारीरिक चाचणीसाठी निश्चित केलेल्या दिनांक व वेळे मध्ये बदल करण्याबाबतची विनंती मान्य केली जाणार नाही.

७) वैद्कीय कारणास्तव शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ मागणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत सत्यता तपासणीनंतर वैद्कीय मंडळाकडून प्रतिकूल अहवाल प्राप्त झाल्यास संबधित उमेदवाराला शारीरिक चाचणी नाकारण्यात येईल.

विहित कागदपत्रे अपलोड करणे:-उमेद्वारंची पात्रता आजमावल्यानंतर उमेदवार जाहिराती नुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे अपोलड करणे.

अ.क्रप्रमाणपत्र/कागदपत्र फाईल (format)किमान फाईल साईज(KB) कमाल फाईल साईज(KB)
अर्जातील नावाचा पुरावा(SSC अथवा शैक्षणिक अहर्ता)PDF५०५००
वयाचा पुरावाPDF५०५००
सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावाPDF५०५००
अनुभवाचा पुरावाPDF५०५००
शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावाPDF५०५००
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रPDF५०५००
१)अर्ज फक्त आयोगाच्या  ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.

२) अर्ज सादर करण्यासाठी https://mpsconline.gov.in या साईट वरती जावे.

आयोगास अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

जिल्हा निवड केंद्र:-

पूर्व परीक्षा खालील सात जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल:-

केंद्र केंद्राचा सांकेतांक
औरंगाबाद१५
मुंबई३०
नागपूर३२
पुणे३८
नांदेड३३
अमरावती१४
नाशिक३५
१) अर्ज सादर करताना जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.

२) जिल्हाकेंद्रावर बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य करण्यात येणार नाही.

परीक्षा शुल्क :-

१) अमागास -रु.५४४/

२) मागासवर्गीय -रु.३४४/

३)परीक्षा शुल्क ना-परतावा आहे.

परीक्षा शुल्क भरण्यासाठी खालील दोन पद्धती वापरता येतील:-

ऑनलाइन पद्धतीने:-

१) क्रेडीट कार्ड,डेबिट कार्ड, अथवा नेट बँकिंगद्वारे परीक्षा शुल्क भरता येईल.

२) कोणत्याही कारणामुळे दिलेल्या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे भरणे न झाल्यास अर्ज करण्याचा अंतिम दिनांका नंतर दोन दिवसापर्यंत परीक्षा शुल्काचा भरणा ऑफलाईन पद्धतीने करण्याकरिता चलनाची प्रत घेता येईल.

ऑफलाईन पद्धतीने:- चलनाद्वारे

१) चलनाद्वरे परीक्षा शुल्क भरण्याचा विकल्प निवडला असला तर चलनाची प्रत घेऊन SBI च्या कोणत्याही शाखेत बँकेच्या वेळेत अंतिम दिनांका पूर्वी परीक्षा शुल्क भरता येणार आहे.

२) दिलेल्या मुदतीत परीक्षा शुल्क न भरल्यास उमेदवाराचा विचार केला जाणार नाही.

प्रवेश प्रमाणपत्र:-

१) परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या वेबसाईट परीक्षेपूर्वी सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल.

२) परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र घेऊन येणे बंधनकारक आहे.

३) परीक्षेच्या वेळी उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळख प्रमाणपत्र, Pan-card, Driving License या पैकी कोणतेही मूळ ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.

४) परीक्षेच्या दिनांका पूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र न मिळाल्यास अर्ज सादर केलेल्या पुराव्यासह आयोगाच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.

५) नावांमध्ये बदल केला असल्यास (विवाहित महिलांच्या बाबतीत) नावात बदल केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी घेतलेला दाखला परीक्षेच्या वेळी हवा आहे.

अधिक माहिती साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या अधिकृत वेबसाईट www.mpsc.gov.in ला भेट द्या.

अर्ज करण्यापूर्वी आयोगाच्या अधिकृत website वरती जाऊन पूर्ण माहिती वाचून घ्यावी.अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे २५ सप्टेंबर २०२३.

Maharashtra Public Service commission Recruitment 2023 महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
online अर्जयेथे क्लिक करा

आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Public Service commission Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप:Maharashtra Public Service commission Recruitment 2023 साठी online from लवकरात लवकर भरावा अखेरच्या दिवशी site ला लोड आला तर वेळ लागू शकतो धन्यवाद.