शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सौर कृषी पंप योजनेची मोठी अपडेट्स; Solar Pump Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar Pump Yojana शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट्स समोर आली आहे.शेतकरी मित्रांना आता सोलर बसवण्यासाठी कोटेशन शिवाय कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही.सोलर बसवण्यासाठी शेतकरी मित्रां कडून अनेक मागण्या केल्या जात आहेत.यामध्ये खड्डे खोदून घेणे,वाहतुकीसाठी पैसे तसेच सिमेंट आणि वाळू आणण्यास सांगणे असे काही प्रकार घडले आहेत.Solar Pump Yojana

आता राज्य सरकारने आणि महावितरण यांनी असे आव्हान केले आहे की कोटेशन शिवाय कोणतीही रक्कम देऊ नये. महावितरण मार्फत मागेल त्याला सौर पंप योजना राबवली जात आहे.सदर योजनेमधून अनुसूचित जाती आणि जमातीमधील शेतकऱ्यांना 95% व इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदान वर सोलर कृषी पंप देण्यात येत आहेत.

मागेल त्याला सौर पंप योजना मार्फत जर आपण 3 HP सौर कृषी पंप योजनेला अर्ज केला असेल,व आपण अनुसूचित जाती आणि जमातीमधील असाल तर तुम्हाला यासाठी 11486 रु. तर इतरांकरीत रु.22,971 तर 5HP सौर कृषी पंप योजनेसाठी रु.16,038 व सर्वसाधारण साठी रु.32,075 इतकी रक्कम भरावी लागत आहे.

अतिरिक्त रक्कम मागितली तर इथे करा तक्रार

शेतकरी मित्रांनो तुमच्याकडून जर अतिरिक्त रक्कमसाठी मागणी होत असेल तर तुम्ही आता तक्रार करू शकता.त्यासाठी जवळील महावितरण केंद्रामध्ये जाऊन तक्रार करू शकता.